धरणगावातील कुस्तीपटू पै.महेश वाघ कुस्ती स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगावातील प्रसिध्द मल्ल रमेश पहेलवान वाघ यांचे सुपुत्र व कैलास माळी सर यांचे पुतणे पै.महेश वाघ याला राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा) स्टुडंट ऑलम्पिक नॅशनल गेम कुस्तीत 55 किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना गोल्ड मेडल मिळाले.यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या स्पर्धेसाठी जाणार आहे.

त्याला धरणगाव येथील प्रसिद्ध मल्ल पै.संदीप कंखरे (कुस्ती मल्लविद्या महासंघ तांत्रिक समिती तालुकाप्रमुख) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांची भगिनी कु.रुपाली वाघ ही सुद्धा राज्यस्तरीय कुस्ती खेळाडू आहे,ती आता एन आय एस कोच चे प्रशिक्षण घेण्यासाठी पतियाळा येथे गेलेली आहे.पै. महेशच्या यशा बद्दल परीसरातून कौतुक होत आहे.पै.महेश व कु.पै.रुपाली हे दोघे भांवडे बालकवी ठोबंरे व सारजाई कुडे विद्यालयाचे शालेय कुस्ती खेळाडू आहेत,तेव्हा पासूनच ते विभाग व राज्य स्तरावर यश संपादन करीत होते.

dharangaon-wrelster

या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीने देखील त्याचा सत्कार केला. याप्रसंगी जि.प.सदस्य माधुरीताई अत्तरदे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर, शहरउपाध्यक्ष सुनिल चौधरी,सरचिटणीस कन्हैया रायपूरकर,मिडिया प्रमुख टोनी महाजन,राजू महाजन,जुलाल भोई,रवी पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here