मुंबई (महाराष्ट्र उपसंपादक सुनिल तांबुसकर) : रविवार (दि.१९) रोजी चाळीसगाव पूरग्रस्त चांभार्डी गावातील पुरात वाहून गेलेल्या घरांची पाहणी करून बुद्धांकुर फाऊंडेशन संस्थापक-अध्यक्ष मा.मित्रबोधी खैरे आणि मंदाताई खैरे यांनी पूरग्रस्त कुटुंबीयांना धीर दिला.
त्याचवेळी त्यांचे पुनर्वसन हेतू येथील सहा कुटुंबांना भांडे (सट) किराणा (रेशन कीट), साडी, सॅनिटरी पॅड, शर्ट पिस, पँट पिस, ब्लँकेट इत्यादी जीवनावश्यक सामग्रीचे वाटप केले.तसेच इतर २५ पूरग्रस्त कुटुंबांना साडी/ सॅनिटरी पॅड/शर्ट पिस/पँट पिस वाटप करण्यात आले.

या प्रसंगी मंदाताई खैरे आणि संगीताताई खैरे यांनी महिलांना मासिक पाळीचे महत्त्व तसेच महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वच्छ्ता कशी पाळावी तसेच सॅनिटरी पॅडचा उपयोग का आणि कसा करावा याची माहिती दिली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, या कामी सढळ हस्ते सामग्री अथवा द्रव्य रुपात दान देणाऱ्या सर्व दान कर्त्यांच्या, संस्था कायम ऋणात राहू इच्छिते.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधू आदरणीय बाळाराम आंबेडकर यांचे पंतू सुनील तंबुसकर, भरतजी मोरे, राहुलजी ब्रह्मे, गौतमजी खैरे, अनिलजी मैराळे, सुभाषजी, चंद्रकांतजी बागुल, डोंगरमोरेजी यांची प्रमुख उपस्थिती होती.






