चाळीसगाव तालुक्यातील जामदा गावातील बौद्ध वस्तीला पोलीस संरक्षण द्या – महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे

anil-gangurde

नाशिक (दिनेश लोंढे) : रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष नाशिक यांचे मार्फत निवेदन देऊन वरील मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

निवेदनात असे म्हटले आहे की चाळीसगाव तालुक्यातील जामदा या गावी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तंभाची जागा असून ह्या जागेवर गावातील सवर्ण समाजातील काही गावगुंडांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असता बौद्ध समाजातील काही नागरिकांनी विरोध केल्याने गांवातील गुंडांनी बौध्दवस्तीवर हल्ला करून अनेक नागरिकांना मारहाण केली यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत त्या गाव गुंडांवर त्वरित गुन्हे दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना कठोर शासन करा व बौद्ध वस्तीत २४ तास पोलीस संरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली.

anil-gangurde-nivedan

याप्रसंगी रिपाई (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,रिपाई कामगार आघाडी चे ज्ञानेश्वर जाधव,श्रमिक आघाडी चे मा.प्रभू गायकवाड,मा प्रवीण रोकडे,युवा नेते अतुलभाऊ ठेंगे,आंबेडकरी चळवळीतील युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here