प्रदुषणमुक्त दिवाळी अभियान शासनाने राबवावे; निसर्गमित्र समितीतर्फे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

nisagarg-mitra-mandal

धुळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती तर्फे नुकतेच धुळे येथील उप जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना शासनातर्फे प्रदुषणमुक्त दिवाळी अभियान राबविण्यात यावे या मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले.

फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषण,जल प्रदुषण,वायु प्रदुषण,अन्न प्रदुषण होते.प्रदुषणामुळे लहान मुलांना ,वृद्धाना व आजारी व्यक्तींना त्रास होतो.तसेच अनेक प्रकारचे आजारास सामोरे जावे लागतात. म्हणून शासनाने प्रदुषणमुक्त दिवाळी अभियान राबवावे या मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले.

यावेळी निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, राज्य सचिव संतोषराव पाटील,जिल्हा अध्यक्ष डी बी पाटील,जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक विलासराव देसले,जिल्हा सचिव विश्वासराव पगार, ,धुळे शहर संघटक मनोज देवरे सर,संघटक पवन शंकपाळ, प्रसिध्दी प्रमुख हर्षल महाजन सर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी फटाके न फोडण्याची शपथ घेतली,तर महाराष्ट्रातील धुळे,नंदुरबार, जळगाव,नाशिक,नगर,औरंगाबाद पुणे,ठाणे,नांदेड,सिंदुदूर्ग,सातारा, सोलापूर,कोल्हापूर,गडचिरोली, परभणी,अमरावती,नागपूर,आदी जिल्ह्यात या विषयी जनजागृती करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहीती संस्थापक-प्रेमकुमार अहिरे,राज्यअध्यक्ष डी आर पाटील,राज्यसचिव संतोषराव आबा पाटील यांनी पत्रकान्वये दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here