‘मॅप एपिक कम्युनिकेशन्स’च्या संचालकपदी पराग गाडगीळ यांची नियुक्ती

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स प्रा.लि.चे कार्यकारी संचालक पराग गाडगीळ यांची ‘मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा.लि.’च्या संचालकपदी निवड झाली आहे.’मॅप एपिक कम्युनिकेशन्स’तर्फे विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावण्यासाठी ‘अंकनाद ‘हे ऍप निर्माण करण्यात आले असून त्यामार्फत भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथावर वेबिनार,राज्यव्यापी पाढे स्पर्धा,पाढ्यांच्या कोडेड एमपी थ्री प्लेयरची निर्मिती,विद्यार्थ्यांसाठी ‘गणितालय’ हे व्यासपीठ अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने संस्थेतर्फे राज्यव्यापी पाढे स्पर्धा गेली दोन वर्षे राज्य पातळीवर आयोजित केली जात आहे.पराग गाडगीळ यांच्या संचालक पदावरील निवडीमुळे या सर्व उपक्रमांना गती येणार असल्याचे ‘मॅप एपिक कम्युनिकेशन्स ‘चे संस्थापक संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे सांगितले. श्री.गाडगीळ यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांच्या विस्तारासाठी ‘मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा.लि.’ मध्ये गुंतवणूक केली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर हे या संस्थेच्या मार्गदर्शक पदावर कार्यरत असून संस्थेने आयोजित केलेल्या गणितविषयक चर्चासत्रात डॉ.सुचेता भिडे-चापेकर,पं.सुरेश तळवलकर,संगीतकार अशोक पत्की इत्यादी मान्यवर सहभागी झाले आहेत.

MAAP EPIC Communication Pvt. Ltd हि २०१९ साली स्थापन झालेली कंपनी, मुख्यतः शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे.इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता विविध पाठांतराच्या प्रणाली तसेच शैक्षणिक उपकरणे तयार करते. कंपनीने नवीन प्रणाली विकसित केली आहे ती म्हणजे ‘अंकनाद’.कंपनीची स्थापना मंदार नामजोशी आणि सौ.निर्मिती नामजोशी यांच्या संकल्पनेतून झाली.

एप्रिल २०१६ मध्ये निर्मिती इ.पी.आई.सी ने ‘अंकनाद’ ची निर्मिती केली. यशस्वीरीत्या परीक्षण, वितरण, विक्री करत ६०००० हुन अधिक विद्यार्थ्यां पर्यंत तसेच १००० हुन अधिक शाळांमध्ये पोचवले आहे.’अंकनाद’ चा विस्तार करण्यासाठी तसेच बहुभाषिक निर्मिती च्या उद्देशाने मॅप इ.पी.आय.सी प्रा.लि या संस्थेची मोठ्या गुंतवणुकीसह निर्मिती झाली.

‘अंकनाद’ विषयी:
पाढे आणि कोष्टके यांना सुश्राव्य संगीताची जोड दिल्याने पाठांतर हे नुसती घोकंपट्टी न राहता त्याबरोबर आकलनशक्तीही वाढते.पावकी,निमकी,पाऊणकी अशी कोष्टके याद्वारे सहजपणे आत्मसात केली जातात व यामुळे लहानमोठ्या आकडेमोडी व इतर गणिते सोडविणे सोपे जाऊ लागते. कॅल्क्युलेटरचा वापर न करता वेगाने व अचूक गणित / हिशोब करणे हे सहज साध्य होते.

हे अॅप शालेय विद्यार्थ्यांना दृष्टीक्षेपात ठेवून तयार करण्यात आले आहे.परंतु,या अॅपच्या माध्यमातून अवगत होणारे गणित विषयक ज्ञान केवळ विद्यार्थ्यांना नाही, तर सर्वच वयोगटातील व्यक्तींना दैनंदिन जीवनातील व्यवहारांसाठी लाभदायक ठरेल. ‘अंकनाद’ हे केवळ अभ्यासाचे ॲप नाही, तर ते स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत करणारे, मेंदूची क्रियाशीलता वाढविणारे एक उत्तम टॉनिक आहे,असे मंदार नामजोशी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here