महापालिकेने अतिक्रमण कारवाई थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा आरपीआयचा इशारा

RPI-jalgaon-nivedan

जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : येथील ईच्छादेवी चौक ते शिरसोली नाका महानगरपालिकेतर्फे होत असलेली अतिक्रमण कारवाई त्वरित थांबण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे येणार्‍या काळात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, जळगांव येथील ईच्छादेवी चौक ते शिरसोली नाका महानगरपालिकेतर्फे होत असलेली अतिक्रमण कारवाई त्वरित थांबण्यात यावी अन्यथा ईच्छादेवी चौकात येथील महामार्ग क्रमांक ६. येथे रिपाई तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तरी शासनाने त्वरित दखल घेत संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन मिलिंद सोनवणे आर.पि.आय युवक महानगर अध्यक्ष जळगांव तथा भिमरत्न तरूण मित्र मंडळ तांबापूर अध्यक्ष यांचा नेतृत्वाखाली जळगांव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी त्यांच्यासोबत नागेश वारूळे प्रविण वाघ सिध्दार्थ गव्हाणे अनिल नन्नवरे अक्षय मेघे दिनेश सोये गोलू सोनवणे पंकज सोनवणे किरण चव्हाण प्रविण ससाणे सतिष सोनवणे इतर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here