ठाणे (प्रतिनिधी सुभाष जैन) : येथील नीलपुष्य साहित्य मंडळाच्या ज्येष्ठ कवयित्री शैला गिरणारकर यांच्या गोदतीरी व मी आणि माझ्या कविता या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन दि २२ सप्टेंबर २०२१रोजी संचार सोसायटीमध्ये त्यांच्या राहत्या घरीच नीलपुष्प अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक श्री.राजेश साबळे,ओतूरकर कवयित्री सौ नंदा कोकाटे कवी आणि प्रवचनकार सौ शामला वाईकर यांच्या हस्ते साध्य पद्धतीने पण खूप सुंदर आणि दिमाखदार झाले.
या प्रसंगी शैलाताई त्याचे पती श्री.दिगंबर गिरणारकर आणि सूनबाई सौ दीप्ती आणि नातू असा परिवार उपस्थित होता.कोरोना साथी मुळे मनात भीतीचे सावट आहे. असे असून तयार झालेले साहित्य घरात ठेवण्यापेक्षा ते रसिक वाचकांच्या समोर यावे या उद्देशाने साध्या पद्धतीने हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
घर संसार मुलं-बाळ नोकरी सांभाळून त्यातून वेळ काढून स्वतःचे छंद जपणे ही महिलांच्या दृष्टीने खूप तारेवरची कसरत आहे…त्यातून जी साहित्य निर्मिती होते ती जीवनात घडलेल्या सर्व लहान मोठ्या प्रसंगाचे चित्रण सुख, दुःख ,चांगले वाईट आलेले अनुभव जीवनाच्या प्रवासात भेटलेले सहप्रवासी याबद्दलचे मनात असलेले विचार साहित्याच्या रूपाने बाहेर येतात आणि मन मोकळं होत…बालपणी जिथे आपण खेळलो बागडलो त्या आठवणी मनाच्या कोंदणात जपून ठेवलेले काही नाजूक क्षण या निमित्ताने बाहेर येतात..त्याचे चित्रण काव्यसंग्रहातून त्यांनी मांडले आहे.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना राजेश साबळे,ओतूरकर म्हणाले.. मुलगी झाली की, काही लोक आपल्या हातून मोठं पाप घडलं की काय? अशी तोंड करतात.. मुलीचं लग्न करताना सुध्दा एखाद बरं स्थळ वाटलं आणि नवरा मुलगा हो म्हणाली की, मुलीच्या पसंतीचा कोणी विचार करीत नाही…. आणि तीही बिचारी दिल्या घरी सुखी राहण्याचा कसोशीने प्रयत्न करते हे सामर्थ्य त्यांच्यात कुठून येते..त्यातून जे साहित्य जन्मास येते दर्जेदारच असणार यात शंका नाही.
या प्रसंगी ठाणे भूषण डॉ नारायण तांबे यांची खूप आठवणी जागृत झाल्या.. या निमित्ताने त्यांचे रितेपण जाणवले. सौ नंदा कोकाटे यांनी ही गिरणारकर ताईंच्या जन्म गावा नाशिक आणि गोदतीर आणि त्यावरून पुस्तकाचे शीर्षक गोदतीरी याचा संबंध आपल्या मनोगतात व्यक्त केला.आणि सौ शामला वाईकर यांनी शैलताई या शामला ताई यांची बालपण मैत्रिण आहोत म्हणून बालपणातील काही किस्से आणि आजही खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत मनोगतात सांगितले.
या गीदातीरी काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ केदार गिरणारकर यांचे असून संपूर्ण लेखनाची डी टी पी आणि मांडणी त्यांच्या सूनबाई सौ दीप्ती गिरणारकर यांनी केली आहे.. तर मी आणि माझ्या कविता हा काव्यसंग्रह पुणे येथील प्रकाशक वेदांतश्री यांनी प्रकाशित केला आहे याचे सुंदर असे मुखपृष्ठ श्री श्रकृष्ण ढोरे यांचे आहे. शेवटी शैला ताईंचे पतीराज श्री दिगंबर गिरणारकर सरांनी साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची। क्रमीन वाट एकांकिही ब्रह्म साधनेची।। सुंदर असे गीत गाऊन झाल्यावर कार्यकमाची सांगता झाली.






