येऊर गाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची आरोग्य तपासणी व स्वसंरक्षण प्रशिक्षण

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : ठाणे महाराष्ट्र शासनाकडून महिला व बाल विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती व जनजागृती येऊर गाव आरोग्य केंद्र या ठिकाणी करण्यात आली.सदर एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प ठाणे २ व ठाणे तीन बाल विकासच्या संपूर्ण माहिती देण्यात आली.

सदर हा कार्यक्रम येऊर गाव आरोग्य केंद्र या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी व आरोग्य अधिकाऱ्यांनी तसेच डॉक्टरांनी व सेल्फ डिफेन्स करण्यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण किशोरवयीन मुलींना स्तनपादन मातांना महिलांना व बालकांना आपले स्वरक्षण कसे करायचे याबद्दल माहिती देण्यात आली सदर हा कार्यक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी अशोक बागुल व जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संगीता मतेगावकर व वनिता मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आरोग्य विभागाच्या अधिकाऱी डॉ.वर्षा ससाणे यांच्या सहकार्याने हीमोग्लोबिन कॅम्पचे आयोजन करून तेथील स्थानिक मुलींना ला किशोरवयीन मुलींना त्यांचे हिमोग्लोबिन चेक करण्यात आले त्याच प्रमाणे सेल्फ डिफेन्स साठी प्रशिक्षण देखील देण्यात आले यावेळी ब्लॅक बेल्ट चॅम्पियन अक्षदा भादवे यांच्याकडून किशोरवयीन मुलींना सेल्फ डिफेन्स कसे करावे याच्याबद्दल प्रशिक्षण देखील देण्यात आले व त्याबद्दल माहिती देखील देण्यात आली.

त्याच बरोबर डॉक्टर वर्षा ससाने यांनी महिलांची तपासणी देखील केली त्याचबरोबर अॅडवोकेट राजेंद्र राव राणे यांनी महिलांना मुलींना कायदेविषयक सल्ला व माहिती दिली यावेळी उपस्थित नगरसेविका मृणाल पेंडसे, महाराष्ट्र पोलीस रक्षकदल संघर्ष समिती प्रदेशाध्यक्ष श्री.सिद्धार्थ जाधव, महाराष्ट्र पोलीसरक्षक महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन ठाणे जिल्हा अध्यक्ष-श्री. सतीश बनसोडे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नताशा निशांत सोनकर, मंदा दत्‍तात्रय वायाळ, चंद्रकला यशवंत भोळे, प्रीती संदीप शिरसाट, रीना पडवळ ,अश्विनी वातास, मंजुळा दाभाडे या अंगणवाडी सेविकांनी विशेष मेहनत घेतली.व हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here