जिल्हाउपनिबंधक कार्यालयातील लाचखोर लेखा परीक्षकाला रंगेहाथ अटक

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरातील जिल्हाउपनिबंधक कार्यालयातील जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी यांना एका पतसंस्थेकडून ऑडीटसाठी ३२ हजार रूपयांची लाच घेतांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत समजलेले वृत्त असे की, तक्रारदार आणि इतर सहकारी यांनी यांच्या विविध पथसंस्थेच्या ऑडीटसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी रावसाहेब बाजीराव जंगले (वय 51) रा.जळगाव यांच्याकडे रितसर अर्ज केला होता. दरम्यान, ऑडीटच्या छानणीसाठी तक्रारदारांकडून ५२ हजार रूपयांची मागणी ३१ जुलै रोजी केली होती. तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने काल (दि.५) सायंकाळी सापळा रचून लाचखोर जिल्हा लेखा परिक्षण अधिकारी जंगले यांनी ॲडीट छाणणीसाठी मागीतलेल्या रकमेपैकी ३२ हजार रूपयांची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नाशिक येथील एसीबीचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने, पोलीस उप अधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, पोकॉ दिपक कुशारे, सचिन गोसावी, एकनाथ बावीस्कर, चालक पो ना दाभोळे यांनी कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here