महापौर सौ.भारतीताई झाल्या क्वॉरंटाईन

जळगाव (निलेश पाटील) – कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर शहरवासियांच्या सेवेसाठी जळगावच्या महापौर सौ.भारतीताई सोनवणे व कैलासअप्पा सोनवणे या दाम्पत्याने घेतलेले परिश्रम कोणीही विसरु शकणार नाही.
महापौर भारतीताई आणि त्यांचे पती कैलासआप्पा सोनवणे यांनी पहिल्या दिवसापासून फवारणीसारख्या उपाययोजनांपासून ते कोविड केअर सेंटरमधील नियमित भेटींच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी केलेले काम जळगावकरांसमोर आहे. कालच त्यांच्या मुलीसह घरातील तिघे पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याने सौ.भारतीताई स्वत:हून क्वॉरंटाईन झाल्या आहेत. त्यांची मुलगी, दीर व पुतण्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याआधी महापौर भारतीताई यांची केलेली स्वॅब तपासणी निगेटीव्ह आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here