नंदुरबार (विजय पाटील) – शहादा येथील नगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वे नंबर ७९ या नवीन वसाहतीत खासदार निधीतून नवीन रस्ता तयार करण्यात आलेला आहे. यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे व हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.रस्ता करतांना कुठल्याही शासकिय निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात आलेले नाही. वसाहतीतील जनता आधीच अनेक समस्यांनी त्रस्त असून मंजूर झालेल्या रस्त्याचे काम समाधानकारक नसल्याने जनता नाराज आहे.
जनतेच्या सेवेसाठी तयार केलेल्या या रस्त्याची योग्य ती चौकशी व्हावी अशी अपेक्षा येथील रहिवासी करीत आहेत. रस्त्याचे ४५० मीटर चे काम पुर्ण झाले असून कामासाठी वापरण्यात येणारी खडी बेसाईज आहे. मूरुम व खडी टाकून प्रेसींग करणे किंवा रोलिंग प्रेसिंग करणे अपेक्षित असतांना तसे होतांना दिसत नाही. पण कुठल्याही प्रकारचे इस्टेमेट प्रमाणे काम होतांना दिसत नाही .खडी ही क्रेसींगची खडी वापरणे गरजेचे आहे तसेच पाणी मारून प्रेसींग करून लेव्हलींग करणे गरजेचे असते.परंतू सर्वत्र रस्त्याची खडी निघतांना दिसत आहे. म्हणून या कामाची चौकशी होणे गरजेचे आहे .येथील साईट इंजिनिअर व ठेकेदार त्यांच्या हलगर्जीपणा ला कोण जबाबदार ? यांच्यात आर्थिक बाजु तर जोपासली जात नाही ना ?खासदार निधीचा योग्य रीतीने व इस्टेमेट प्रमाणे खर्च करणे गरजेचे आहे. परंतु असे होतांना दिसत नाही. त्या वसाहतीतील जनतेच्या म्हणण्यानुसार शासकीय ठेकेदार व साइट इंजिनिअर यांची चौकशी होणे गरजेचे आहे खासदार ताई यांच्यावर काय कार्यवाही करतील याकडे जनतेचे लक्ष्य लागून आहे .








