निसर्ग-मित्र समिती व हरवलेली पाखरं गृपतर्फे पिळोदे येथे वृक्षारोपण

अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती-व हरवलेली पाखरं गृप पिळोदे तालुका अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पिळोदे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक-प्रेमकुमार अहिरे अध्यक्षस्थानी होते,तर निसर्ग-मित्र समिती चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सब गव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील,जिल्हा संपर्क-प्रमुख विजय-वाघ सर,शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर आर सोनवणे सर,चोपडा तालुका संपर्क-प्रमुख विश्राम तेले,चोपडा तालुका संघटक कांतीलाल पाटील सर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ व पिळोदे चे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हेते,या वेळी सोशल डिस्टींगसिलचे पालन करून गावातील प्रमुख चौकात ७ते ८ फुटाचे विविध प्रकारचे वृक्षांचे लागवड करण्यात आली, सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अमळनेर तालुकाध्यक्ष भूषण पवार, स्वप्निल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here