गर्लफ्रेंडने रागात मोबाईल फेकून मारल्याने तरुणाचा मृत्यू

केला नेसियन (अर्जेटिना) : येथे एका मुलीनं रागात जे काही केलं, त्यामुळे आता तिला तुरुंगात जावं लागू शकतं. २२ वर्षीय रोक्साना एडेलिन लोपेज हिने रागात आपल्या २३ वर्षीय बॉयफ्रेंड लुइस ग्वांटे याला मोबाईल फोन फेकून मारला, यात मार लागल्याने लुइसचा जीव गेला. रोक्साना हिच्याविरोधात सध्या तपास सुरू आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रोक्सानाचा बॉयफ्रेंड लुइस तिला मारहाण करत होता. यावेळी स्वतःच्या रक्षणासाठी तिनं बॉयफ्रेंडला फोन फेकून मारला, हा फोन त्याच्या डोक्याला जाऊन लागला. फोननं मार लागल्यानंतर लुइसला डोकेदुखी आणि अस्वस्थपणा जाणवू लागला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता समजलं, की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशनही केलं मात्र त्याला वाचवू शकले नाहीत. यानंतर लुइसची आई पोलिसांकडे गेली आणि संशयितांविरोधात कारवाईची मागणी केली. पीडिताच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं, की मोबाईल फोनमुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं यातच लुइसचा मृत्यू झाला. जेसिकानं कोर्टाला सांगितलं, की मागील ९ वर्षांपासून तिचा पार्टनर तिच्यावर अत्याचार करत होता. याच कारणामुळे तिनं हे पाऊल उचललं. रोक्सानाने म्हटलं, की माझ्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता. कदाचित याप्रकरणी तरुणीला कोर्टाकडून मुक्त करण्यात येऊ शकतं कारण तिने हत्या करण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या बचावात हे पाऊल उचललं होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here