बेलापुर येथे दोन ठिकाणी धाडसी दरोडा

अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील बेलापूर गावातील गो शाळेजवळ असणाऱ्या दोन ठिकाणी चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला असून या दरोड्यात रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागीने घेवून चोरटे पसार झाले आहे. ही घटना समजताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. चोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथकही बोलविण्यात आले होते.

बेलापुर श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे. रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात असलेल्या लहान मुलीच्या गळ्याला चाकु लावला त्यामुळे घरातील सर्व जण घाबरले त्यांनी शांत बसणे पसंत केले जवळपास दिड तास चोरट्यांनी घरात निवांतपणे उचका पाचक केली.

त्यांच्या घरातील लग्नाचा अलबमही चोरट्यांनी निवांतपणे पाहीला. त्यातील घरातील महीलांचे फोटो शोधुन फोटोत अंगावर घातलेले दागीने लवकर काढुन द्या असेही चोरट्यांनी दरडावले एक फोटो पाहुन या महीलेच्या गळ्यातील हे दागीने लवकर द्या अशीही मागणी चोरट्यांनी केली. त्यावर हा फोटो आमच्या मावशीचा आहे, असे सांगताच या फोटोतील महीला व ही महीला एकच वाटते असेही चोरटे म्हणाले खंडागळे यांच्या घरातुन जवळपास पंधरा ते वीस तोळे सोने व रोख रक्कमही चोरट्यांनी लांबविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून, त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here