भुसावळ (गिरीश पवार) – खान्देशातील मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार कमी झाली आहे. पावसाचा अभाव व वाढता खर्च या बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांना खते देणे टाळले आहे. परिणामी, खतांची मागणी घटली आहे. त्यामुळे खतांच्या दुकानासमोरील शेतकऱ्यांची गर्दी ओसरली आहे.
भुसावळ तालुक्यात युरिया,10: 26: 26 यासारख्या खतांची मोठी टंचाई मागील दोन ते अडीच महिने होती.सध्या स्थितीतही युरियाचा पुरवठा कमी आहे. परंतु पूर्वहंगामी कापूस , केळी व तृणधान्ये अधिक उत्पादन लागवड असलेल्या भागात मागील 10 ते 15 दिवसापासून पाऊस नाही. खते पावसाळी वातावरण थंड किंवा तुरळक पाऊस सुरू असताना अनेक शेतकरी पिकांना देत असतात. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन ज्वारी कापूस या पिकांना दुसऱ्यांना रासायनिक खते देण्याचे नियोजन केले होते परंतु पावसाने दडी मारली ऊन तापत आहे उष्णता प्रचंड व पाऊस नसल्याने हातांवर पोट असतांना खतांसाठी केलेला खर्च वाया जाईल या भीतीने शेतकरी खते खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील खतांच्या दुकानासमोरील शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र दुरापास्त झाले आहे.







