नाशिक (विशेष प्रतिनिधी) – मुलाने आपल्यापेक्षा मोठे कर्तृत्व गाजवावे ही प्रत्येक वडिलांची इच्छा असते. वडीलांची इच्छापूर्ती करण्यासाठी अनेक पाल्य निकराचे प्रयत्न करुन यश संपादन करतात. त्यांच्या यशप्राप्तीनंतर पालकांचा ऊर अभिमानाने भरून येतो.
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील चांदवड पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे एएसआय कैलास जगताप यांचे चिरंजीव सुमित जगताप यांनी युपीएससी परिक्षेमध्ये यश संपादन केले आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील सोशल मिडीयाद्वारे सुमित यांचे अभिनंदन केले आहे.







