अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : कुर्डुस मतदार संघातील विकास हा तरुणांना केंद्रबिंदू माणून केला जाणार आहे. तरुणांच्या समस्या सोडविण्याबरोबरच या परिसरात विविध विकासकामे राबवून विकासगंगा आणण्याचे अभिवचन अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी कुर्डुस मतदार संघातील नागरिकांना दिले आहे.
कुर्डुस येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापरिषदेच्या कुर्डुस मतदार संघात शिवसेनेची घौडदौड सुरुच आहे. ही घौडदौड पाहून शेकापचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास तयार आहेत. काही दिवसात या कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. राजकारणाबरोबर समाजकरणातून या विभाचा विकास साधण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
त्यानुसार या विभागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर या मतदार संघाचा विकास सुरु ठेवताना तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळावेत यासाठी रोजगार मार्गदर्शन शिबीरे, महिलांसाठी विविध रोजगार वृद्धी प्रशिक्षण शिबीरे राबवली जाणार असल्याचे आ. महेंद्र दळवी यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मा.आमदार महेंद्र शेठ दळवी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी उप तालुका प्रमुख प्रकाश पाटील विभाग प्रमुख योगेश जुईकर कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेंद्र पाटील कुसुंबळे विभाग उप विभाग प्रमुख महेश वावेकर अरविंद पाटील प्रमुख मन्मय पाटील कुर्डूस विभाग प्रमुख तुषार शरमकर कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य जिवन पाटील उत्तम शेठ पाटील कुर्डूस उप विभाग प्रमुख सूर्यकांत केणी कुर्डूस शाखा प्रमुख कांचन केणी दिपक पाटील नवखार व विभागातील सर्व शाखा प्रमुख उप शाखा प्रमुख परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.






