जयपूर (राजस्थान) : येथे झालेल्या रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. चाकसूजवळ बायपासवर एका ट्रॉलीवर इको व्हॅन आदळली. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
राजस्थान टिचर्स इलिजिव्हिलिटी (REET) परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या परीक्षार्थींचा मृतांमध्ये समावेश आहे. ते सर्व बाराहून सिकरकडे जात होते. इको व्हॅनमध्ये एकूण १० जण होते. त्यातील अनेकजण REET परीक्षेसाठी जाणारे परीक्षार्थी होते.
बाराहून सिकरकडे जात असताना अको व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन ट्रॉलीला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, व्हॅनमधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना महात्मा गांधी आणि सवाई मानसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






