सातारा जिल्ह्यातून दोन महिला, एक पुरुष गायब

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : जिल्ह्यातून दोन महिला व एक पुरुष गायब झाले असल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यापैकी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात एक तर शिरवळ पोलीस ठाण्यात दोन तक्रारी आहेत.

कऱ्हाड येथील शनिवार पेठेतून शुभांगी अरुण कुंभार (वय २१, रा. शिंदे गल्ली, शनिवार पेठ, कऱ्हाड) ही युवत्ती गायब झाल्याची तक्रार कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना दि. २३ रोजी रात्री ११ ते दि. २४ रोजी सकाळी ७ या वेळेत घडली. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथून दीपाली दत्तात्रय लोंढे (वय ३०, रा. रामेश्वर टॉवर, शिरवळ, ता. खंडाळा, मूळ रा. बत्तीस शिराळा, जि. सांगली) ही विवाहिता गायब झाल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे. राहत्या घरातून कामाला जाते असे सांगून ती निघून गेली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

शिरवळ येथील दत्तनगर येथून बाळासो नंदकुमार जाधव (वय ५३, मूळ रा. संग्रामनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे बेपत्ता झाल्याची तक्रार शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे. जाधव यांना घरातून वारंवार निघून जाऊन परत येण्याची सवय आहे. मात्र, ते दि. २७ मार्च २०२० रोजी शिरवळ येथील दत्तनगरमध्ये असणाऱ्या राहत्या घरातून निघून गेले आहेत. सातारा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस पळवून नेले असल्याची तक्रार तिच्या भावाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, संबंधित मुलगी सोळा वर्षांची असून तिला तालुक्यातील एका गावाच्या हद्दीतून कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here