अलिबाग-सोगावकर : एक्साईज विभागात ए.एस.आय.पदावर कार्यरत असलेले अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील शंकर कुशाबा हाके यांची नुकतीच दुय्यम निरीक्षक(पी.एस.आय)या पदावर पदोन्नती मिळाली आहे.
एक्साईज विभागात रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी आपली सेवा अतिशय प्रामाणिकपणे व निर्विघ्नपणे पार पाडली आहे.प्रामाणिकपणे आपली भूमिका व सेवा योग्य प्रकारे बजावणारे श्री शंकर हाके यांना वरिष्ठांनी त्यांची दुय्यम निरीक्षक (P.S.I.) या पदावर पदोन्नती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ते आपली पुढील सेवा बजावणार आहेत.

यानिमित्ताने शंकर कुशाबा हाके यांचा श्री.गणेश मित्रमंडळ मुनवली, महिला मंडळ मुनवली तसेच ग्रामस्थांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करत पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मापगांव ग्रामपंचायत सदस्य सौ.सानिका घाडी, संतोष बांन्द्रे, सतीश घाडी, मधुकर सूद, सुधाकर ठकरूळ, सचिन घाडी, शैलेश तिर्लोटकर, मनिष खाडे, संजय अनमाने, अमोल मोंढे, सुरेश हाके, सुरेश पाटील, रोशन पुजारी, जयेश ठकरूळ, विजय पंडम, वामन ठकरूळ, सुनील मोंढे, केदार ठकरूळ, गीतेश ठकरूळ, अक्षय नागावकर, यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






