हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : चंद्रपूरच्या भद्रावती इथे आयोजित बुधवार, दिनांक, 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 दरम्यान होणाऱ्या महिलांच्या खुल्या व किलो गटामध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी हिंगणघाटचा ऑल इंडिया बॉक्सिंग संघ जाहीर झाला आहे.
या स्पर्धेत कामगिरीच्या आधारावर निवड करण्यात आलेल्या हिंगणघाटच्या बी, सी, सी, क्रीडा संकुलन येथील ऑल इंडिया बॉक्सिंग संघाच्या नेहा सातघारे ६३ किलो, (हिंगणघाट), प्रीती वानखेडे ७० किलो, (हिंगणघाट), अंकिता जगताप ५४ किलो,(हिंगणघाट) व पायल गावंडे ५० किलो,(सेलू शेकपूर बाई) यांची राज्यस्तरीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
ऑल इंडिया बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक,नदिम शेख, तसेच समाजसेवक, राकेश शर्मा यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले, यासह हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक, संपत चव्हाण यांनी अभिनंदन केले असून भ्रमणध्वनिवरून माजी राज्यमंत्री, अशोक शिंदे यांनी देखील अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






