बुलंद पोलिस टाइम्सचे संपादक सुनील पाटील यांची कर्जत येथे भेट

रायगड (जिल्हा क्राइम ब्युरो रिपोर्टर जयेश जाधव) : कर्जत येथे बुलंद पोलिस टाइम्सचे मुख्य संपादक सुनील पाटील यांनी भेट दिली. यावेळी कर्जत येथे त्यांचे बुलंद पोलिस टाइम्सचे कर्जत तालुका क्राइम रिपोर्टर मोहनशेठ ओसवाल सोबत बुलंद पोलिस टाइम्सचे रायगड क्राइम ब्युरो रिपोर्टर जयेश जाधव यांनी स्वागत केले.

यावेळी बोलताना बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील यांनी, कर्जत येथील जनता आणि पोलीस यांच्यातील समन्वय साधण्यासह, विविध गुन्ह्यांवर प्रकाश टाकण्याचे व त्या गुन्ह्यातील पिडीतांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी ते पुढे म्हणाले की, कर्जत व परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या केवळ बातम्या प्रकाशित करणे हे बुलंद पोलिस टाइम्सचे ब्रीद नसून, या गुन्ह्यातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी जनता आणि पोलीस यांच्यातील दुवा म्हणून बुलंद पोलीस टाइम्सचे कार्य राहणार आहे. विविध विषयांवर चर्चा करताना त्यांनी उपस्थितांशी येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्या अडचणींवर उपायदेखील सुचविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here