जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : मुंबई येथे महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले मराठी भाषा व वाचन संस्कृती टिकून ठेवण्यासाठी ग्रंथालये काळाची गरज असून ग्रंथालय चळवळीला पाठबळ देणे आवश्यक आहे आज काल मोबाईल कॅम्पुटर यांच्या युगात पुस्तक वाचायला कोणाला वेळ नाही त्यामुळे आपली संस्कृती,आपला इतिहास हा मुलांना कळेल कसा वाचाल तर वाचाल जोपर्यंत आपले विद्यार्थी पुस्तकी ज्ञान घेणार नाही वाचनालयात जाऊन पुस्तके वाचणार नाहीत तर त्यांना इतिहास कळेल कसा त्यासाठी महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीला बळ दिले पाहिजे वाचनालये सुरु केले पाहिजेत त्यांच्या समस्या सोडणे हे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी माजी मंत्री सचिन भाऊ अहेर,मा खासदार गजानन कीर्तिकर,मा आमदार शिरसागर,ग्रंथालय सेनेच्या सल्लागार श्रीमती शिल्पा पोतदार,ग्रंथालय सेनेचे प्रमुख बी.डी देशमुख,उपप्रमुख पी एम पाटील सर मान्यवरांनी दोन दिवसीय शिबिरात मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाराष्ट्रातील शासनमान्य ग्रंथालयाचे पदाधिकारी ग्रंथालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पोकळे,रवींद्र धुमाळ, बापूसाहेब जाधव, नांदेडचे महाराज व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.






