अखिल भारतीय समता परिषद जळगाव जिल्ह्याच्या युवक कार्याध्यक्षपदी सुरेंद्र विठ्ठल महाजन यांची नियुक्ती

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी समधान पगारे) : तालुक्यातील मेहुणबारे येथील रहिवासी असलेले सुरेंद्र विठ्ठल महाजन. यांना आपल्या चांगल्या कामाची पावती मिळाली आहे. महाजन यांनी विविध संघटनेत काम करून आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला आहे. एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची आजपर्यंत ओळख झालेली आहे.कुठल्याही सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात आणि नेहमी गरजू लोकांना ते आपल्या परीने होईल ती मदत करतात.

त्यांच्या या कामाची दखल घेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बाळूभाऊ कर्डक. यांच्या हस्ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदाचे. नियुक्तीपत्र देण्यात आले.

जळगाव जिल्हा अध्यक्ष माननीय सतीश महाजन सर संतोष भाऊ विरकर प्रदेश प्रचारक समता परिषद राजेंद्र महाजन नगरदेवळेकर अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डाके सर .देविदास महाजन ग्रामपंचायत सदस्य मेहुणबारे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here