युवा संकल्प प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश; गोरेगाव पूर्व भागात रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात

मुंबई (क्राइम रिपोर्टर पंकज यादव) : पी/दक्षिण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गोरेगाव पूर्व वार्ड क्रमांक ५४ येथील रोडवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरीकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असे तसेच वाहनांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते.

याबाबत स्थानिक राहिवाशांनी युवा संकल्प प्रतिष्ठानकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत युवा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला. खड्डे लवकरात लवकर न बुजविल्यास या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देताच महानगरपालिका पी/दक्षिण विभाग जागा झाला व सर्व खड्डे बुजवून रस्ता स्थानिक जनतेसाठी मोकळा करून दिला.]

yuva-sankalp-pratishthan

युवा संकल्प प्रतिष्ठानने केलेल्या पाठपुराव्याबद्दल स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या या कार्याबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here