पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल-हकला हृदयविकाराचा झटका

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मॅचविनर फलंदाज इंझमाम-उल-हकला सोमवारी हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी त्याच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेनंतर इंझमामची प्रकृती आता स्थिर आहे. इंझमाम उल हकला डिस्चार्ज मिळाला असून तो घरी आला असल्याचे ट्विट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन रमीझ रझा यांनी यावेळी केले आहे. ५१ वर्षीय इंझमाम -उल – हकला मागील तीन दिवसांपासून छातीत कळा येत होत्या. त्यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

प्राथमिक चाचण्यांमध्ये त्याचे सर्व अहवाल सामान्य आले होते, मात्र सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे निष्पन्न झाल्याचे ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ने म्हटले आहे. इंझमाम उल-हकला हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटनेनंतर क्रिकेट विश्वातून अनेक खेळाडूंनी त्याच्यासाठी प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here