राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; महिलांमध्ये जळगावची मानसी पाटील राज्यात प्रथम

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक राज्य कर आयुक्त अशा पदांसाठी जुलै २०१९मध्ये घेतलेल्या ‘राज्य सेवा (मुख्य) परीक्षा -२०१९’चा सुधारित निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत कऱ्हाड येथील प्रसाद चौगुले हे सर्वसाधारण वर्गवारीतून, मालेगाव येथील रोहन कुवर हे मागास प्रवर्गातून पहिले आले आहेत. तर महिलांमधून जळगावमधील मानसी पाटील राज्यात पहिल्या आल्या आहेत.

आयोगाने उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपशिक्षणाअधिकारी, सहाय्यक कर आयुक्त, कक्षाधिकारी, नायब तहसिलदार अशा एकूण ४२० पदांसाठी १३ ते १५ जुलै २०१९ या कालावधीत ही परीक्षा घेतली होती. जून २०२०मध्ये मुलाखती घेऊन अंतिम निकाल जाहीर केला होता. त्यात काही उमेदवारांची निवडही करण्यात आली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असलेली पदे अराखीव (खुल्या) पदांमध्ये रुपांतरित केली आहेत. त्यानुसार हा सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

upsc-merit

उमेदवारांचा सुधारित निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (कट ऑफ) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पदध्तीने अर्ज करणे आवश्यक आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here