जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना बुधवारी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली या शिवाय फार्मवर जप्ती आली यासह एक ना अनेक बाबींवर बुधवारी सकाळपासून सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहेत मात्र या बाबी निव्वळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही शिवाय कोणतेही जप्ती, कारवाई वा नोटीस आलेली नाही, अशी माहिती जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणीताई खडसे यांनी दिली.
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, विरोधकांकडून निव्वळ बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. अफवा पसरवून बदनामी करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. कुठलेही चुकीचे काम केलेले नाही त्यामुळे घाबरण्याचे काम नाही, न्याय व्यवस्थेवर आपला परीपूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड.खडसे म्हणाल्या की, माजी मंत्री एकनाथराव खडसे हे खाजगी कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले आहेत त्यामुळे केवळ काही लोकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच जप्तीदेखील झालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.






