कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा : सुप्रिया सुळें यांची मागणी

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मदत व्हावी या हेतूने महिला व बालकल्याण विभागानं तालुकास्तरावर वात्सल्य समित्या स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु अनेक ठिकाणी या समित्या अस्तित्वात आल्या नसल्यानं संबंधित महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या समित्यांमुळे कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांना मोठा आधार मिळणार आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आपणास नम्र विनंती आहे की,कृपया जेथे या समित्या नाहीत तेथे त्या स्थापन करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here