बुलंद पोलीस टाइम्सच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा कार्यकारी संपादकपदी मनोज सोनवले

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगपंचायक, महापालिका कर्मचारी संवर्ग समिती संघटनेतर्फे मनोज सोनवलेंचा सत्कार

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : जनता आणि पोलिसांमधील दुवा साधण्याचे काम करणाऱ्या तसेच पिडीतांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्स या न्यूज चॅनल व साप्ताहिकाच्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांच्या वरिष्ठ कार्यकारी संपादकपदी मनोज अशोकराव सोनवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत, महानगरपालिका कर्मचारी संवर्ग समिती संघटना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, मलाबादे पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र भिसे, बी.बी. बिरनाळे महालक्ष्मी इ. न. प पतसंस्थेचे व्हा.चेअरमन संतोष पासोबा, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना उपाध्यक्ष संजय पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दगडू माने, समीर गैबान यांनी अभिनंदन करत सत्कार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here