मुंबई (संपादक सुनिल पाटील) : मुंबई पोलीस आपल्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यापासून ते नियम मोडणाऱ्या लोकांबद्दल मजेदार पोस्ट शेअर करण्यापर्यंत सोशल मीडियावर अॅक्टीव असतात. त्यांच्या विविध उपक्रमांचे लोकांकडून कौतुकही होत असते.
आता मुंबई पोलिसांच्या बँडनेच्या एका व्हिडीओला सोशल मिडीयावर लाइक केले जात असून ‘खाकी स्टुडिओ’ चा एक नवीन व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलीस बँडच्या नवीन व्हिडिओमध्ये पोलीस १९८६ मधील कर्मा चित्रपटातील गाणे वाजवताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मा चित्रपटातील ‘ए वतन तेरे लिऐ’ ची धून वाजवताना दिसतात. व्हिडिओमध्ये, सर्व तालबद्द संगीत प्रदर्शित करत असल्याचे दिसत होते. सर्व पोलिसांचा सूरांच्या या कार्यक्रमात उत्तम ताळमेळ बसल्याचे दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘ए वतन तेरे लिऐ …
.






