सिकलसेल अँनिमियावरील उपचाराचा प्रवास’ : पद्मश्री डॉ.सुदाम काटे यांची २ ऑक्टोबर रोजी मुलाखत

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : आदिवासी भागात आढळणाऱ्या सिकल सेल अँनिमिया या आजारावर ४० पेक्षा अधिक वर्ष संशोधन आणि उपचार करणाऱ्या पद्मश्री डॉ.सुदाम काटे यांच्या ‘सिकलसेल अँनिमियावरील उपचाराचा प्रवास’ या विषयावरील ऑनलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.नील मल्टी इव्हेंटस तर्फे हा उपक्रम २ आणि ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती नीलम बेंडे यांनी दिली .

नीलम कट्टा हा नील मल्टी इव्हेंटस यांचा उपक्रम असून आतापर्यत वेगवेगळया क्षेत्रातील व्यक्तीच्या 20 पेक्षा अधिक मुलाखती प्रसारीत झाल्या आहेत. डाँ काटे यांचे वय ८८ असून आजही ‘सुदाम काटे रिसर्च फौंडेशन’च्या माध्यमातून ते कार्यरत आहेत

आदिवासी भागात आढळणाऱ्या सिकल सेल अँनिमिया या आजारावर गेली ४० पेक्षा अधिक वर्ष संशोधन आणि प्रत्यक्ष कार्य करताहेत.या संशोधनाची दखल घेऊन भारत सरकारने २०१९ मध्ये त्याना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. ही मुलाखत दिनांक २ व ९ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता नील मल्टीइव्हेंट्सच्या फेसबूक पेजवर आणि ‘नीलम कट्टा’ या यूट्युब चॅनलवर प्रसारित होईल.मुलाखतीचे नाव सिकल सेल गांधी भाग १ व भाग २ असे असणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here