बरेली (उत्तरप्रदेश) : येथे शेजाऱ्याने दारूच्या नशेत तिसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. पीडितेच्या शेजाऱ्याला मुलीच्या कुटुंबीयांनी २५ सप्टेंबर रोजी पत्नी आणि मुलासह जेवणासाठी आमंत्रित केले होते. कुटुंबातील सदस्य संभाषणात गुंतले होते. तेव्हा आरोपी मुलीला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिला धमकावत याबद्दल कोणालाही सांगू नको असे सांगितले होते. मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना झाल्याची तक्रार केल्यानंतर आणि अल्पवयीन मुलीच्या आजीने चौकशी केल्यावर तिने सांगितले की तिच्या काकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
मुलीच्या पालकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि बुधवारी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. बरेलीच्या वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, रोहित सिंग सजवान हाआरोपी कुटुंबाला ओळखतो आणि त्याने मुलीला शांत राहण्याची धमकी दिली होती. ती घाबरली आणि तिने आजीला अत्याचार झाल्याचे दोन दिवसांनी सांगितले. इज्जतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३७६ बलात्कार, ५०६ गुन्हेगारी धमकी आणि पॉक्सो कायद्यासह एफआयआर नोंदवला आहे. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली आहे. बरेली एसएसपी म्हणाले, अल्पवयीन मुलीवर उपचार करण्यात आले आहेत आरोपीनी दारुच्या प्रभावाखाली मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.






