ब्रेकअप केल्याच्या रागात प्रेयसीने दगड आणि रॉडने तुडवून घेतला प्रियकराचा प्राण

दिल्ली : गुरुग्राममधल्या एका रिक्षाचालकाच्या खून प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली असून, या रिक्षाचालकाच्या प्रेयसीनेच त्याचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याचं उघडकीस आलं आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मृत आसिफ उत्तर प्रदेशातल्या बदायूंचा रहिवासी होता आणि गुरुग्राममध्ये तो ऑटो चालवत होता. रिक्षाचालकाला बेदम मारहाण होत असल्याची खबर मिळल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण तो गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान आज गुरुग्राम पोलिसांनी या खून प्रकरणात मृत तरुणाची प्रेयसी सोनिया आणि तिचा मानलेला भाऊ याकूबला अटक केली आहे. गेल्या ३ वर्षांपासून रिक्षाचालक आसिफ आणि सोनिया यांच्या रिलेशनशिपमध्ये वाद सुरू होते. प्रियकर आसिफने त्याच्या पालकांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि यासाठी त्याने सोनियाला सोडण्याचे ठरवले होते. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि तिने रागाच्या भरात आपल्या प्रियकराचा खून केला.

गुरूग्राम पोलिसांनी या खून प्रकरणात वापरण्यात आलेल्या काठ्या आणि लोखंडी रॉड जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मारेकरी उत्तर प्रदेशाचे रहिवासी आहेत आणि गुरुग्राममध्ये राहून नोकरी करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here