मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : घाटकोपर येथे ६ व्या सुविधा समुदाय केंद्राचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. स्नानगृह, शौचालय, पिण्याचे पाणी, यांत्रिक कपडे धुलाई या सुविधा इथे आहेत. इथे पुनर्वापरातून पाण्याची बचत होईलच शिवाय स्थानिकांचे राहणीमानही उंचावेल.
हिंदुस्तान युनिलिव्हर व एचएसबीसी इंडिया ने मुंबई महानगरपालिकेला हे केंद्र उभारण्यात केलेल्या सहकार्यासाठी मनापासून आभार मानतो. यावेळी उपमहापौर सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, नगरसेविका अर्चना भालेराव, स्नेहल मोरे जी आदी उपस्थित होते.

धारावीत १११ शौचकूप असलेले सुविधा केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. मुंबईत अशी आणखी सुविधा केंद्र उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.






