भीम आर्मी ने दिली मनवेल येथील पीडित कुटुंबांना भेट
बहुजन समाज पार्टी काँग्रेस तसेच भिम टायगर ,विविध संघटनेने भेट घेतली
यावल – तालुक्यातील मनवेल येथे आंबेडकर चौक येथे गेट ला गाडीचे चाक मारल्याच्या वादा वरून एका तरुणाने त्याला समज दिल्याच्या कारणावरून तरुणाला वाड्यात घुसून मारहाण करण्यात आली आणि जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली, पुन्हा त्या तरुणांसह 3 तरुणांना नदीकाठी 15/20 लोकांनी मारहाण केली…झालेल्या घटने बद्दल विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेला धारदार शस्त्र घेऊन काही लोकांचा जमाव वाड्यात घुसून मारहाण करायला लागला,या ठिकाणी काही मुलांना मारत असतांना त्या मुलाच्या आईच्या हाताला लागल्याने हात फ्रॅक्चर झाला असून त्यांना दवाखान्यात दवाखान्यात दाखल करण्यात आले होते,सदर घटनेवरून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपी अटकेत असल्याची माहिती मिळालेली आहे..तरी तेथील तरुणांवर काही महिलांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाल्याची माहिती देखील प्राप्त झाली..या गावात या घटनेमुळे हा हा परिवार भयभीत झालेला आहे . या परिवाराला पाठींबा देण्यासाठी मनवेल तालुका यावल येथे ,भीम आर्मीच्या न्याय मिळावा म्हणून पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे . या घटनेची सहानिशा करून पोलीस प्रशासनाने योग्य तो न्याय मिळवून द्यावा हे ही गणेश भाऊ तायडे रमाकांत दादा तायडे यांनी बोलताना सांगितले आहे . भीम आर्मी भारत एकता मिशन चे महाराष्ट्र राज्य प्रमुख माननीय नेहा ताई शिंदे यांच्या आदेशावरून ,भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मा. रमाकांत तायडे,. भीमा आर्मी जळगाव युनिट चे जिल्हा अध्यक्ष मा. गणेश भाऊ सपकाळे ,भीम आर्मी, जिल्हा संघटक सागर मेघे , जळगाव जिल्हा युनिट चे मा. विक्रम भाऊ प्रधान व .जळगाव युनिट चे सचिव मा, सुपडू भाऊ संदानशिव, तसेच बहुजन समाज पार्टी राज्य कार्य करणे सदस्य महिला आघाडी शमीभा ताई पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभाताई मोरे , चुंचाळे बोराडे नायगाव किनगाव हिंगोना भुसावळ सावदा मोहराळा कोरपावली साखळी सर्व सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते






