कल्याणमध्ये धान्य व इतर वस्तुंचे वाटप करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
कल्याण – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण पूर्व मधील साईबाबा नगर,संघर्ष क्लासेस येथून शेकडो गरजूंना धान्य व गृहउपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. धान्यामध्ये तांदूळ,डाळ, सोयाबीन,कांदे,पीठ,साखर व चहा पावडर यांचा समावेश होता.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सरकारने टाळेबंदी लागू केल्याने अनेक संसार उघडयावर पडले,सर्वच व्यवसाय बंद झाल्याने अनेकांची उपासमार झाली.सरकारी मदत तोकडी असल्याने अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते.
कल्याण पूर्व येथील वार्ड क्रमांक ४४ मधील महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा सुधा शहा,वार्ड क्रमांक ४२ मधील विभाग अध्यक्षा सुजाता कदम,वार्ड क्रमांक ९३ मधील शाखाध्यक्षा सुरेखा जगताप यांच्या विभागात अनेक कुटुंबांना अन्नधान्य,अर्सेनिक गोळ्या व सॅनिटरी नॅपकिन यांची आवश्यकता असल्याची बाब जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड यांच्यामार्फत जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम यांच्या कानावर घातली असता स्वाती कदम यांनी ताबडतोड दखल घेऊन शेकडो गरजू कुटुंबांना धान्य व इतर वस्तुंचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला.यासाठी त्यांना जिल्हा सचिव वासंती जाधव, जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड, जिल्हा संघटक भारती कुंमरे, उपशहर अध्यक्षा गीता काट्रप व प्राची मोरे यांनी मोलाची साथ लाभली.
वार्ड क्रमांक १०२ मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम यांनी जीवनाश्यक वस्तुं दिल्या तर जिल्हाध्यक्षा सौ.नयना भोईर यांनी सॅनिटरी नॅपकिन,तसेच श्रेया भांबीड यांनी तांदूळ दिले त्याचप्रमाणे अर्सेनिक गोळ्यांची मदत डॉ.अश्विनी लोखंडे यांनी केली.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम,जिल्हाध्यक्षा नयना भोईर,जिल्हा सचिव वासंती जाधव,जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड,जिल्हा संघटक भारती कुंमरे,उपशहर अध्यक्षा गीता काट्रप,उपविभाग अध्यक्षा कोमल राय,विभाग अध्यक्षा सुधा शहा,विभाग अध्यक्षा सुजाता कदम,उपविभाग अध्यक्ष ज्योति कुशवाह ,विभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे,शाखाध्यक्षा सुरेखा जगताप,प्राची मोरे,किरण गायकवाड,स्वप्निल कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






