शिक्षिकेनेच बनवला वसतिगृहातील मुलींचा अश्लील व्हिडीओ

अलीगड (उत्तरप्रदेश) : येथील कस्तूरबा गांधी वसतिगृहातील शिक्षिकेनेच वसतिगृहातील मुलींचा अश्लील व्हिडीओ बनवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आरोपी शिक्षिका फरार झाली आहे. तर शिक्षिका फरार झाल्याने तिने व्हिडीओ व्हायरल केल्यास बदनामी होईल, या भीतीने अनेक विद्यार्थिनींची तब्येत बिघडली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अलीगडच्या मडराकमधील कस्तूरबा गांधी निवासी मुलींच्या वसतिगृहातील महिला शिक्षिकेने वसतिगृहातील अनेक विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुमच्या कुटुंबियांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी शिक्षिकेने विद्यार्थिनींना दिली होती.

काही विद्यार्थिंनीच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वसतिगृहात येत गोंधळ घआलण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि तपास अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आरोपी शिक्षिका फरार झाली होती. फरार झालेल्या शिक्षिकेने आपले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्यास बदनामी होईल, या भीतीने अनेक विद्यार्थिनींची तब्येत बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विज्ञानाच्या शिक्षिका रुबी राठोड यांनी धमकावत आमचे आंघोळ करतानाच अश्लील फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली. तसेच याची वाच्यता केल्यास कुटुंबियांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही शिक्षिकेने दिली होती.

मुलींनी दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षिका रुबी राठोड, वसतिगृहाचा गेट कीपर आणि वॉर्डनविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच फरारी शिक्षिकेचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेत फरारी शिक्षिकेने व्हिडीओ व्हायरल केल्यास मुलींची बदनामी होईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here