तेलंगणात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर पाच जणांचा सामूहिक बलात्कार

निजामाबाद (तेलंगणा) : येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना तेलंगणात घडली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ही तरुणी घरी परतत होती. तेव्हा तिला वाटेत एका बाईकस्वाराने लिफ्ट दिली. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते.

त्यांनी तिला घरी सोडण्याविषयी सांगितलं आणि त्यांच्यापैकी एका बाईक स्वाराच्या पाठी ती बसली. मात्र, ते तिला ड्राईव्हवर जाऊया असं सांगून निजामाबादला घेऊन गेले.

तिथे एका रुग्णालयाच्या निर्जन इमारतीत नेऊन त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात पाचहून अधिक जणांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here