कोकेनची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कोकेनची विक्री करणाऱ्या नायजेरियनला अमली पदार्थ विरोधी पथक एकने विद्यापीठ रस्ता परिसरात अटक केली. त्याच्याकडून २ लाख २० हजारांचे कोकेन, मोबाईल, दोन दुचाकी, असा मिळून २ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त केला. जप्त करण्यात आले आहे. नंदी ओडीनका हेन्री (वय ३७, रा. पिंपळे गुरव, मूळ-नायजेरिया) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कोकेनची विक्री करणारा नायजेरिन विद्यापीठ रस्ता परिसरात असल्याची माहिती एपीआय लक्ष्मण ढेंगळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून नंदी हेन्री याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून २ लाख २० हजारांचे कोकेनसह इतर ऐवज जप्त केला. ही कामगिरी एसीपी लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, मारूती पारधी, मनोज साळुंके, चेतन गायकवाड, संदीप जाधव, राहूल जोशी, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, संदेश काकडे, योगेश मोहित यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here