कर्जत एमएससीबीचे कर्मचारी रविंद्र मोहोकर सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : येथील एम एस सी बी चे कर्मचारी रवींद्र मोहोकर सेवानिवृत्त झाले यावेळी एम येस इ बीच्या कार्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके, सहाय्यक अभियंता योगेश साबळे, रविंद्र मोहोकर व त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित होते.यावेळी उपस्थित कर्मचारी यांनी रविंद्र मोहोकर यांचे भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.रविद्र मोहोकर एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांच्याकडे काम करण्याची चांगली पद्धत आहे सर्वांशी प्रेमाने वागून या कंपनी परिवारात त्यांनी काम केले आहे त्याचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे त्याच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाला त्याची आईची उपस्थिती हे फार मोठे भाग्य आहे असे सांगून त्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी रविंद्र मोहोकर यांनी कर्मचारी वर्गाला संबोधित केले सर्वांनी जपून काम करा स्वतः ची काळजी घ्या असे सांगितले याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके, सहाय्यक अभियंता योगेश साबळे, डांगे साहेब, रितेश साबदी, गायकवाड, हरेश म्हात्रे,काळोखे,राजू मरले,शेख कदम आंबोले कवठे,बडेकर, गणेश गावडे, संतोष मरले व महिला कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here