संकटात स्वत:च्या प्रजेची काळजी न घेणाऱ्या राजाला जनतेने घरी बसवावे : महाविकास आघाडी नेत्यांचा सुर

बेटावद गणातील उमेदवार ललित वारुडे यांच्या प्रचारार्थ पाष्टे येथे जंगी सभा संपन्न

शिंदखेडा (प्रतिनिधी) : कोविड-19 च्या संकट काळात स्वत:च्या प्रजेची काळजी न घेणाऱ्या गढीवरच्या राजाला जनतेने या निवडणुकीत कायमचे घरी बसवावे. त्यांना घरी बसविणेच योग्य असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सक्षम आहेत. त्याचा प्रत्यय कोविड-१९ च्या संकटात जनतेने अनुभवलाच आहे, असा सुर महाविकास आघाडीच्या नेत्यांची येथे व्यक्त केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक २०२१ च्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीतर्फे बेटावद येथील उमेदवार ललित वारुडे यांची जंगी सभा पाष्टे गावांत गुरुवारी दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजता उत्साही वातावरणात संपन्न झाली. या सभेला पाष्टे गावासह बेटावद गटातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या बैठकीला शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, माजी जि.प.सदस्य पोपटराव सोनवणे, काँग्रेसचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, पाष्टेचे माजी सरपंच मधुकर शिरसाठ, शिवसेनेचे जिल्हा संघटक मंगेश पवार, बेटावदचे उपसरपंच संदीप थोरात, पं.स.सदस्य भगवान पिंपळे, राष्ट्रवादीचे जगदीश ठाकरे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, पं.स.सदस्य बापू माळी, संतोष माळी, हिरालाल बोरसे, पं.स.सदस्य दिपक पाटील, महाविकास आघाडीचे बेटावद गटाातील उमेदवार ललित वारुडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके म्हणाले की, ज्यांना येथील जनतेने चार वेळा आमदार म्हणून निवडून दिले, त्यांनी कोविड-19 च्या संकटकाळात जनतेसाठी काय केले ? असा सवाल विचारत संकटात स्वत:च्या प्रजेची काळजी न घेणाऱ्या अकार्यक्षम राजाला जनेतेने घरी बसविणेच योग्य असा टोला लगावला. भाजपाच्या काळात देशातील संपत्ती विकण्याचे काम सुरु असून त्याला विरोध केल्यास ईडी, सीबीआयची चौकशी लावली जाते. भाजपाला धडा शिकविण्यासाठीच महाविकास आघाडीचा जन्म झाला आहे. यानंतर श्री.साळुंके यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली.

दोन भावात, दोन जातीत, दोन धर्मात, दोन कुटूंबात व देशात फूट पाडणारा पक्ष म्हणजे भाजप असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणजे अलीबाबा चाळीस चोर या गोष्टीतील चाळीस चोर आहेत, असा दणदणीत प्रहार काँग्रेसचे पोपटराव सोनवणे यांनी केला. तर बेटावद गणातील उमेदवार ललित वारुडे यांनी कोविड-19 काळात जनतेची केलेली सेवा व गावातील न झालेल्या विकास कामांवर ताशेरे ओढले. तसेच जिल्हा परिषदेच भ्रष्ट कारभारातवर जोरदार टिका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here