फडणवीसांचा मराठवाडा दौरा , राजकीय चर्चांना फुटलं तोंड

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागाच्या दौऱयावर आहेत. उद्या वाशिम जिह्यातून त्यांच्या पाहणी दौऱयाला सुरुवात होणार आहे. ते मराठवाडय़ातही जाणार असल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेही त्यांच्यासोब असणार हे निश्चित मानले जात होते. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण आजारी असल्याचे ट्विट केल्याने उलटसुलट राजकीय चर्चांना ऊत आले आहे.

फडणवीसांकडून दौऱयाची घोषणा आणि पंकजा मुंडे आजारी पडणं यामुळे तर्कवितर्क बांधले जात आहेत. विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसून आली. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असल्याची घोषणा केली. वाशिममधून आपण तीन दिवसीय पाहणी दौऱयाला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन मदत मिळवणार -फडणवीस
मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर स्थानिक प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱयावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here