जप्त करण्यात आलेला माल कमी प्रमाणात असल्याचे सांगत गांजा बाळगणाऱ्याला जामीन मंजूर

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणात एकाला १५ हजार रुपयांचा जामीन सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी मंजुर केला आहे.

व्यंकट श्रवण गवंडी (वय 28, रा. लातुर) असे जामीनावर सोडलेल्या व्यक्तीचे नाव असून, न्यायालयीन कोठडीत असताना त्याने ॲड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.

जप्त करण्यात आलेला माल कमी प्रमाणात आहे. त्यामुळे एनडीपीस ऍक्‍टचे कलम ३७ लागू होत नाही. तपास पूर्ण झाला आहे. त्याला जामीन देण्याची मागणी ॲड. श्रीकृष्ण घुगे यांनी केली. या प्रकरणात आणखी एकावर गुन्हा दाखल आहे. पोलीस शिपाई समीर रासकर यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. ७ सप्टेंबर २०२१ रोजी कासारवाडी रेल्वे स्टेशन येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ४ किलो ३३८ ग्रॅम वजनाचा 90 हजार 650 रुपयांचा गांजा जप्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here