मालेगाव (प्रतिनिधी आकाश सावंत) : शहरात कुत्ता गोळीसह मोठ्या प्रमाणात अxमली पदार्थांची विक्री होते असून, हे ड्रग्जतस्करीचे जाळे नेमके कुठपर्यंत आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
मुंबईच्या नार्को टेस्ट विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली. गुजरातमधल्या मीरादातार येथे झोपडपट्ट्यांमधली अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी त्यांनी छापे मारले. त्यात रुबीना हे नाव पुढे आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा ती ड्रग माफिया असल्याचे उघड झाले. तिचे पूर्ण नाव रुबीना नियाज शेख आहे.
पोलिसांनी रुबीनाला बेड्या ठोकल्यात. मात्र, या टोळीचा म्होरक्या निलोफर सांडोले पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे. याप्रकरणी रुबीनाचा कसून चौकशी केली असता, तिच्या टोळीने मालेगावमध्ये हातपाय पसरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता अमली पदार्थांच्या टोळीची चेन उद्धवस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.







