बेबीबंपचा फोटो शेअर करत अभिनेत्री मानसी नाईकने दिली गूड न्यूज

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

त्यांच्या लग्नाचे काही फोटो वर्षभरानंतर ही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. मानसी महाराष्ट्रीयन आहे तर प्रदीप हा हरियाणाचा असून, तो बॉक्सर, अभिनेता आणि मॉडेल आहे.



दरम्यान, नुकताच मानसीने सोशलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतून तिने ‘गुड न्युज’ दिली आहे. गरोदर असल्याची गोड बातमी तिने चाहत्यांशी शेअर केली आहे. या फोटोमध्ये मानसीचा बेबी बंप पहायला मिळतोय. ‘कमिंग सून’ असा हॅशटॅग तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये मानसी आणि प्रदीपने साखरपुडा केल्याचं जाहीर केलं होतं. साखरपुड्याच्या आधी काही महिन्यांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर हे दोघे विवाह बंधनात अडकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here