मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : आज महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती साजरी करण्यात आली. गांधीजींच्या जन्मदिनीच ‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह हे आहेत.
नथुराम गोडसे यानेच गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली होती. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत संदीप सिंह यांचा तिसरा चित्रपट आहे. याआधीच त्यांचे ‘सावरकर’ आणि ‘वाईट’ नावाचे दोन चित्रपट सोबत करत आहेत. गोडसे चित्रपटाची निर्मिती संदीप सिंह तर निर्देशक राज शंदिलिया यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये होणार आहे.
आज चित्रपटाचं एक टीझर रिलीज करण्यात आलं आहे. तसेच चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. टीजरमध्ये लिहिलं की, ‘जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं बापू, आपका नथूराम गोडसे’.
संदीप सिंह यांनी म्हटलं की, मी अनेक दिवसांपासून नथूराम गोडसेची स्टोरी मांडण्यासाठी प्रयत्नशील होतो. हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचायला हवा. गांधी-गोडसेंच्या अनेक गोष्टी आहेत. यातून फॅक्च्युएल बाजू समोर आणणार असल्याचंही संदीप सिंह यांनी नमूद केलं.






