शिर्डी ( प्रतिनिधी )- १८ महिन्यापासून कोरोणामुळे आर्थिक संकटाचा काळ सुरू आहे. शिर्डी व परिसरात साईमंदिर बंद असल्यामुळे तर मोठी आर्थिक मंदी आलेली आहे. असे असताना गोरगरीब व अडचणीच्या संकटात सापडलेल्या कुटुंबांना साईबाबा संस्थान चे निवृत्त अधिकारी चंद्रकांत उर्फ नाना गुरव यांनी आपल्या जनसंपर्क व दानशूर साईभक्त भाविकांच्या सहकार्यातून नेहमीच समाजहितासाठी मदत करण्यासाठी प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने ५०कुटबातील लोकांना जवळपास दोन लाख रुपये खर्च करून किराणा किट वितरण करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे
आपल्या समाजसेवेच्या भावनेतून येथील साईबाबा संस्थानचे निवृत्त कर्मचारी व समाजसेवक चंद्रकांत (नाना) गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली व मुंबईच्या एका साईभक्तांच्या देणगीतून शिर्डी व परिसरातील अनेक कुटुंबांना नुकतेच त्यांनी किराणा किट वाटून तसेच विविध साहित्य देण्यासाठी एक कार्यक्रम पार पडला.
आपलेही समाजाप्रती बांधिलकी आहे हि भुमिका ठेवून गुरव यांनी आपले हे कार्य नुकतेच पार पाडले . यापूर्वीही साईभक्त गुरव यांनी विविध ठिकाणी पायी जाणाऱ्या दिंडी मधील पदयात्री ,वारकरी गरजुना शिक्षणासाठी वधुवर विवाह आजारपण साईबाबा संस्थान दवाखान्यात लाखो रुपयांची औषधे उपलब्ध करून दिली आहे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अडचणीत ,संकटात सापडलेल्या पूरग्रस्तानाही त्यांनी रग, शाली ,अन्न पाकिटे वाटून मदत केली होती व करत असतात. अनेक श्री साईबाबा संस्थानच्या अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना ही त्यांची अशीच वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे आहे अशा या उपक्रमात ते नेहमीच योगदान दिले आहे






