कर्जतमध्ये गृहोपयोगी उत्पादनांचे प्रदर्शन

कर्जत -( जयेश जाधव ) : कर्जत शहरातील उद्योजिका स्वाती वैद्य आणि कीर्ती जोशी संचालित मिळून सार्‍याजणी या महिला उद्योजिका समूहातर्फे गृहोपयोगी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
दि.2 ऑक्टोबर रोजी ब्राह्मण सभा सभागृहात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

सदरच्या प्रदर्शनात एकूण 13 महिला उद्योजकांनी आपापले स्टॉल मांडले होते. इमिटेशन ज्वेलरी, लहान बाळांचे कपडे, बेडशीट, ड्रेस मटेरिअल, पूजेच्या वस्तू, विविध पर्सेस, घाणीचे खाद्य तेल, क्रोशाच्या वस्तू आणि विविध खाद्यपदार्थ असे गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात पाहायला मिळाले. कोविड 19 चे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here