मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवुडची दमदार अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा आई झाली आहे. अभिनेत्रीने एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नेहा धुपियाचा पती अंगद बेदीने मुलाच्या जन्माविषयी पोस्ट करत याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे . नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी रविवारी आपल्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. अंगद आणि नेहाला आधीच मेहर नावाची एक मुलगी आहे.
जुलै महिन्यात नेहा आणि अंगदने सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यां नेहाच्या गर्भधारणेची माहिती दिली. या फोटोमध्ये पती अंगद बेदी आणि मुलगी मेहर नेहासोबत दिसली होती.आता नेहा पुन्हा आई झाल्याच्या बातमीने सर्वजण आनंदी आहेत.आज अंगद बेदीने नेहा धुपियासोबतचा एक फोटो शेअर करून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने लिहिले आहे की ‘ आज सर्वात श्रेष्ठ शक्तीने आज आम्हाला मुलाचा आशीर्वाद दिला. नेहा आणि बाळ दोघेही ठीक आहेत. असे कॅप्शन देण्यात आले आहे.
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी मे 2018 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. विशेष गोष्ट म्हणजे त्याच वर्षी 18 नोव्हेंबर रोजी तिने तिच्या मुलीला जन्म दिला. या काळात लग्नाआधी झालेल्या प्रेग्नेंसीची बातमीमुळे नेहा चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती.अशा परिस्थितीत आता नेहा पुन्हा आई झाल्याच्या बातमीने तिचे चाहते खूप आनंदी आहेत.
नेहा धुपिया नुकतीच ‘देवी’ या लघुपटामध्ये दिसली होती. आता नेहा ‘ सनक’ मध्ये दिसणार आहे. विद्युत जामवाल ‘सनक’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत.






